Breaking News

पाकिस्तानला हरवण्यासाठी जीव ओतू ः श्रीजेश

नवी दिल्ली, दि. 29 - मलेशियामध्ये 20 ते 30 ऑक्टोबर दरम्यान एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. या टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानला हरवण्यासाठी जीव ओतू असे वचन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी.आर. श्रीजेश याने दिले आहे.
पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भारताच्या हॉकी टीमचा सामना होणार आहे. त्यामध्ये पाकिस्तानसोबत पराभव पत्करुन भारतीय जवानांना नाराज करणार नाही, असे वचन श्रीजेशने दिलें. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक होतो. त्यामुळे या सामन्यात भारतीयांना आपला संघ खूश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिल. उरी हल्ल्यातील शहिदांनी हीच खरी श्रद्धांजली असेल, असे श्रीजेशने सांगितले आहे.