कॉल ड्रॉपसंदर्भात ‘ट्राय’ने बोलावली दूरसंचार कंपन्यांची बैठक
नवी दिल्ली, दि. 29 - रिलायन्स जिओ आणि अन्य दूरसंचार कंपन्यांमध्ये कॉल ड्रॉपवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 30 सप्टेंबर रोजी सर्व दूरसंचार कंपन्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत रिलायन्स जिओच्या दरांच्या आदेशाच्या कथित उल्लंघनावरही चर्चा करण्यात येणार आहे. ट्रायचे अध्यक्ष आर.एस.शर्मा यांनी ही माहिती दिली. आम्ही शुक्रवारी किंवा सोमवारी सर्व दूरसंचार कंपन्यांची बैठक बोलावली आहे. काही कंपन्यांनी आम्हाला पत्र लिहून रिलायन्स जिओ टॅरिफ ऑर्डरचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. याच संदर्भात कंपन्यांनी बैठक बोलावण्याचीही मागणी केली होती, असे शर्मा यांनी नमूद केले.