जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
मुंबई, दि. 29 - जागतिक आरोग्य संघटनेच्या 2012 च्या आकडेवारीनुसार भारतात वायू प्रदुषणामुळे वर्षभरात 6 लाख 21 हजार 138 लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, भारतात होणार्या एकूण मृत्यूंपैकी हे प्रमाण 75 टक्के आहे. बहुतांश लोकांना श्वसनाचे विकार, हृदयरोग, तसेच फुफ्फुसाशी संबंधित आजार झाले आहेत. 2012 च्या आकडेवारीनुसार भारतात हृदयरोगामुळे 2 लाख 49 हजार 388 जणांचे मृत्यू होतात. जगभरात प्रत्येक 10 पैकी 9 जण घातक हवेचं श्वसन करत आहेत. वायू प्रदुषणामुळे होणारे 90 टक्के मृत्यू हे मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये आहेत. अर्थात प्रत्येक गोष्टीला असतात तसे या समस्येपासून सोडवणूक करण्यासाठी देखील उपाय आहेत.