Breaking News

लग्नाच्या अमिषाने विधवेवर बलात्कार ः एकास अटक

सांगली, दि. 28 -  असहाय्यतेचा फायदा घेत विधवेवर बलात्कार केल्याप्रकरणी सचिन यमनाप्पा डबनार (26, रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) याला अटक करण्यात आली.
न्यायालयाने त्याला 29 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत विधवेने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित विधवेला दोन मुले आहेत. मुलगा तिच्या आईकडे राहतो. तर मुलगी वसतिगृहात राहते. 15 मार्च 2015 ते 4 जुलै 2016 या काळात विधवेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर त्याने वेळोवेळी बलात्कार केला. पीडितने त्याच्याकडे विवाहासाठी तगादा लावल्यानंतर तो तिला मारहाण करुन शिवीगाळ करत होता. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोलीस निरिक्षक प्रदीपकुमार जाधव करीत आहेत.