मुख्याधिकार्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकावुन नागरिकांनी व्यक्त केला रोष
परभणी, दि. 28 - जिंतुर शहरातील अलपसंख्यांक बहुल भाग असलेल्या जमजम कॉलनी येथिल स्ट्रीट लाइट मागील काही महिन्यापासून बंद असल्याने व सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या परिसरात राहणार्या नगरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच नगर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष् देऊन सदरील परिसरातील स्ट्रीट लाइट तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी एम.आय.एम चे तालुका अध्यक्ष मो.हारून आपल्या कार्यकर्त्यांसह पालिकेत पोहचले असता त्यांना जबाबदार मुख्याधिकारी न भेटल्याने एम.आय.एमच्या कार्यकर्त्यांनी असंतोष व्यक्त करत मुख्याधिकारी याच्या खुर्चीला फुलांचा हार अर्पण करुन खुर्चीला निवेदन चिटकवले यावेळी तालुका अध्यक्ष मोहम्मद् हारून लाडले,सय्यद बबलू,मोहसिन खान,शेख़ खालिद ,हारून जमदार ,शेख़ समीर, शेख ज़मीर याच्यासह जमजम कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.