Breaking News

भुजबळ लॉबीतील ‘तळीराम’ अभियंत्याला मुख्यमंत्र्यांचे अभय?

सार्वजनिक बांधकाम : रणजीत हांडेंविरूध्द सचिवांच्या तक्रारीला केराची टोपली

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 29 - सार्वजनिक बांधकाम खात्यातील कारभार ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने सुरू आहे असे म्हणने धाडसाचे ठरावे.... सध्या या खात्याचा कारभार -’एकच प्याला’ या नाटकाच्या कथानकालाही स्पर्धेत मागे टाकतो की काय अशी चर्चा सुरू आहे.
साबांत सुरू असलेल्या या ’एकच प्याला’, नाटकाचा नायक आहे अर्थातच नाशिक सांबा मंडळाचे अधिक्षक अइभयंता रणजीत हांडें! लातूर, उस्मनाबाद, सोलापूर, मुंबई शहर इलाखा असा विविध विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम केल्यानंतर हे तळीराम सध्या नाशिक साबां विभागात अधिक्षक अइभयंता म्हणून कार्यरत आहेत. या हांडें नामक तळीरामांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली, बढतीही मिळवली. कार्यपध्दतीत मात्र तसुभरही बदल झाला नाही किंबहूना जाणीवपुर्वक केला नाही. सोलापूर, उस्मनाबाद, लातूर या भागातील मर्जीतील कंत्राटदार आयात करणे, स्थानिक कंत्राटदार डावलणे, देयकांमध्ये हेराफेरी करणे, नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबविणे या आणि अशा गैरव्यहारप्रकरणी या तळीरामांची बरीच ख्याती झाली आहे. याच ख्यातीला साजेसा प्रराक्रम या हांडें नामक तळीरामाने मुंबई शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असतांना करून दाखविेला.
महाराष्ट्र सदन प्रकरणाशी संबंधित वादग्रस्त ठरलेल्या क्लिनचिट अहवालाच्या निमित्ताने तळीराम चांगलेच चर्चेत आलेत. या अहवालाचे सर्व ड्रॉफ्टींग हांडे यांनीच केल्याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत.  त्यांच्या या कार्यशैली मागे कुठला हेतू व कुठली चाल आहे हे या ठिकाणी वेगळे सांगण्याची गरज नाही .या पुर्वी याच सदरातून या तळीरामाचा दै.लोकमंथनने बरेचदा पर्दाफाश केलाय. याच पार्श्‍वभुमीवर सचिव दर्जाच्या उच्च पदस्थांनी या तळीरामाचा बुरखा फाडण्याची मोहीम हाती घेतल्याचे समजतो. या सचिवांनी या तळीराम हांडे संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे तक्रार दुसर्‍याचे अधिकृत वृत्त आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना दखल घेतली नाही. का? त्याचा तपशिलवार व्रुत्तांत उद्याच्या अंकात.....(क्रमश:)