Breaking News

विनाशकाले विपरीत बुध्दी !!

दि. 29, सप्टेंबर - माणसाचा अंत जवळ आला की त्याला बदफैली चाळे सुचतात, म्हणजेच विनाशकाली विपरीत बुध्दी....आखुड दांड्यांच्या कुर्‍हाडीचा वार स्वतःच्याच पायावर बसणार याची जाणीव असतांनाही वार करण्याचा मुर्खपणा करावा तोच मुर्खपणा शिवसेना करतांना दिसते. खर तर शिवसेना हा मराठ्यांचा, मराठी माणसांची संघटना. मात्र गेल्या काही काळापासून शिवसेना आपले अधिष्ठान  सोडून भलतीकडेच भरकटत आहे. प्रबोधनकार ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना स्व.बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीसह देशाच्या विविध भागात रूजविली. केवळ महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर मराठी तरूणांच्या मनात जाज्वल्य राष्ट्रप्रेम रूजविण्यात बाळासाहेब खर्‍या अर्थाने यशस्वी ठरले  शिवसैनिकांवर मुलासारखे प्रेम करणारे शिवसेनाप्रमुख व शिवसेना प्रमुखांवर बापापेक्षाही जास्त प्रेम करणारे शिवसैनिक यांचे वेगळेच रूनानुबंध महाराष्ट्राने जवळपास 5 दशकं अनुभवले. या नात्याची पतप्रतिष्ठा दोन्ही बाजूने जीवापाड जपली गेली. साहेबांच्या शब्दाबरहुकुम जीव देणारा शिवसैनिक...या शिवसैनिकाविषयी शिवसेना प्रमुख नेहमीच आस्था जपतांना दिसत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत मराठा तरूण प्रचंड मोठ्या संख्येने होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कित्येक मराठा तरूणांनी उमेदीची वर्ष शिवसेनाप्रमुखांसाठी खर्ची घातली. त्याच मराठा शिवसैनिकांनी केलेल्या त्यागाने शिवसेनेला सत्तेच्या बोहल्यावर चढविले. बाळासाहेबांनंतर शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून याच मराठा समाज शिवसैनिकांनी उध्दव ठाकरेंवर तेव्हढेच प्रेम केले. तीच ताकद दिली. मात्र पित्याने केलेले प्रेम या शिवसैनिकांना पुत्राकडून कधीच मिळाले नाही. उलट पिंगा घालणार्‍या चांडाळ चौकडीने खर्‍या शिवसैनिकांपासून ठाकरेंना खूप दूर नेले. विशेषत: मराठा. तरीही सारं सोसून हा शिवसैनिक साहेबांवरील प्रेमापोटी काम करीत राहीला.
तथापि ठाकरेंना घेरलेल्या संजय राऊत नामक नारदाने कळ लावली. मराठा समाजाविषयी सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी मायभगीनींच्या पदरालाच हात घालण्याचा व्यंगपणा जाणीवपुर्वक केला. त्याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील. याविषयी पाहणारच आहोत. संजय राऊत यांनी शिवसेना संपविण्याची सुपारी घेतलीय. कशी? पाहू या उद्याच्या दखलमध्ये...