Breaking News

ललीता बाबर सातारा भूषण पुरस्काराने सन्मानीत

सातारा, दि. 29 - (प्रतिनिधी) : सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट आणि सातारकर नागरिकांतर्फे दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार 2016 या सालासाठी रिओ ऑलिपिंकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणार्‍या ऑलिपिंक धावपटू ललिता बाबर यांना शाहू कला मंदिरात सुवर्ण पदक विजेते हिंद केसरी गुरु सत्पाल सिंग यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अणि ज्येष्ठ करसल्लागार अरूण गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.  
ललीता हिचे सत्कार शाळामधून घ्या ज्यातून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि ललीतासारखे खेळाडू निर्माण होतील, असे गुरु सत्पाल सिंग यावेळी सुचविले. सत्काराला उत्तर देताना ललीता हिने सर्व देशवासीयांच्या पाठबळ आणि शुभेच्छावरच मी अगदी पायाला जखम असतानाही फायनल मध्ये 10 वी आले ही गोष्ट माझे प्रशिक्षक तसेच माझे कुटंबियांपासूनही मी लपवून ठेवली. तुमच्या सार्‍यांच्या पाठबळावरच मी आज देशवासियांची अपेक्षा टोकियो ऑलिंपिक मध्ये निश्‍चित पुर्णं करेन, अशी ग्वाही दिली. अध्यक्षीय भाषणात शिवाजी राजे भोसले यांनी गोडबोले परीवाराचे हे कायर्ं खरोखरच स्तुत्य आहे, ललिता हिला हा पुरस्कार पाठबळ देणारा ठरेले असे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विश्‍वस्त अशोक गोडबोले,डॉ. अच्युत गोडबोले, उदयन गोडबोले यांचे हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक भाषणात डॉ. अच्युत गोडबोले यांनी पुरस्काराविषयीची माहिती दिली. सौ. संजीवनी गोडबोलेे यांनी आभार प्रदर्शन केले. या समारंभास माजी आयकर आयुक्त अरुणराव पवार, जयवंत चव्हाण, माजी महराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते, संभाजीराव पाटणे, राजेंद्र चोरगे, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, दिलीप पाठक, रफीक बागवान, बबनराव उथळे, राजेंद्रं शेलार, प्रकाश गवळी, खंडूशेठ सारडा, श्रीकांत शेटे, सौ. अनुपमा गोडबाले, डॉ. सौ. अनुराधा गोडाबोले, किशोर शेठ नावंधर, रमणलाल शहा, चं. ने. शहा, सुधीर पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.