दे.राजा येथे सामना पेपरचे दहन
दे.राजा (प्रतिनिधी) दि. 29 - देऊळगाव राजा सहीत देऊळगाव मही येथे सर्व संघटना तसेच राजकीय पक्षातील मराठा तरूणाच्या वतीने बस्थानक चौकात दैनिक सामना वृत्तपत्राचे दहन करण्यात आले.
सामना वृत्तपत्राच्या पुरवणीमध्ये अत्यंत विकृत असे व्यंगचित्र काढून मराठा समाजाची व भगिनींची बदनामी कारक व्यंगचित्र काढल्या कारणाने दैनिक सामना वृत्तपत्र जाळून निषेध करण्यात आला. महाराष्ट्रात निघत असलेले मराठाक्रांती मूक मोर्चे हे जगासमोर आदर्श निर्माण करत असतांना सामना वृत्तपत्राने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून मराठा समाज मोठ्या प्रमाणात दुखी झाला आहे.
संबंधित व्यंगचित्रकार व संपादकांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी राजकीय, तसेच सामाजीक संघटनांनी सामना वृत्तपत्राचे होळी करून केली.