Breaking News

शालेय क्रिडा स्पर्धेत नुतनची नैत्रदिपक कामगीरीे

सेलु प्रतिनिधी, दि. 28 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा.पुणे व जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने दि. 23 ते 25 सष्टें रोजी शालेय राज्य टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा गंगापूर येथे संपन्न झाल्या या स्पर्धत नूतन विद्यालय संस्कारचे 17  वर्ष मुली  संघाची कास्यपदक तर  19 वर्ष मुले संघ रौप्य पदक प्राप्त केले.
 17 वर्ष मुली संघानी औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करत अमरावती विभागाचा 2:0 सेट मध्ये पराभव करत उपात्यं फेरी गाठली , कास्यपदक साठी मुंबई विभागाचा पराभव करून कास्य पदक प्राप्त केले , 17 वर्ष आतील मुली:- कु. रोशनी जोशी, (कर्णधार)भाग्यश्री गव्हाणे, अंजली अस्वले, मंजु पौळ, झिझुर्डे कल्याणी, जान्हवी पाटील.
19 वर्ष मुले संघ नी औरंगाबाद विभागाचा नेतृत्व करत अमरावती , मुंबई विभागाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली, अंतिम फेरीत पुणे विभागाशी कडवी झुजं देत 2:0 अशा औरंगाबाद विभागाचा पराभव होऊन रौप्यपदक पटकावले.
19 वर्ष आतील मुले :- चंद्रशेखर ताठे (कर्णधार) सिध्दांत लिपने, यासर नासर, बेग अझहर , जोशी तुषार , सौरभ माळवे.  या संघास भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय साडेगांवकर यांच्या तर्फ सर्व खेळाडूंना क्रीडा गणवेष देण्यात आले. या संघास मार्गदर्शन सतिश नावाडे, गणेश माळवे, प्रा. नागेश कान्हेकर, डी.डी.सोन्नेकर, यांचे लाभले.  या यशा बदल संसध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, उपाध्यक्ष अ‍ॅड. वंसतराव खारकर, सचिव डी.के देशपांडे, सहसचिव डॉ.व्ही.के. कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी,डॉ. शरद कुलकर्णी, मु.अ. नरेंद्र पाटील, अनिल कुलकर्णी, पंजाब खडसे, सुरेश रणखांबे, प्रा. के.के.कदम, जिल्हाक्रीडाधिकारी सी.व्ही. साखरे, व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून राज्य स्पर्धस शुभेच्छा दिल्या.