महाराष्ट्रातील 130 प्राचार्यानी शिक्षण संचालकांना दिले निवेदन
परभणी, दि. 28 - शैक्षणिक वर्ष 2016-18 साठीची बीएड व एम एड प्रवेश प्रक्रिया शिक्षण संचालनालय पुणे यांच्या कार्यालयामार्फत राबवली जात आहे. बीएड व एम एड प्रवेशाच्या चार फेर्या झाल्या असूनही अद्याप पर्यंत महाविद्यालयातील हजारो जागा रिक्त आहेत. महाष्टात 550 बीएड तर 110 एम एड महाविद्यालये आहेत . या महाविद्यालयाच्या एकूण प्रवेश क्षमतेपैकी केवळ 9000 जागांवर प्रवेश झालेले असून 26000 जागा रिक्त आहेत. विविध कारणामुंळे महाराष्टातील पदवी प्राप्त विदर्याी बी एड / एम एड सिईटी पासून वंचित राहले आहेत . महाविद्यालयाकडे सिईटी न दिलेल्या विर्द्याांनी प्रवेशासाठी मोठ्याप्रमाणात अर्ज हि केले आहेत. अश्या प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना रिक्त राहिलेल्या जागेवर प्रवेश दिला तर विर्द्याी व कार्यरत प्राचार्य , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हिताने योग्य राहील. तरी मा शिक्षण संचालक महोदयांनी यावर योग्य निर्णय घाव्या अश्या आशयाचे निवेदन सर्व प्राचार्य यांच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर महाराष्टाच्या विविध जिल्ह्यातुन आलेल्या बीएड / एम एड महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत. त्यामध्ये डॉ माधुरी लुडबे पुणे , डॉ सतीश सातव औरंगाबाद , डॉ धनंजय वडमारे नाशिक , श्री तेजस तिडके बीड , डॉ विजय पव्हणे परभणी , डॉ गोपाळ पवार लातूर , डॉ केशव इंगोले नांदेड , डॉ मोटे के एस उस्मानाबाद , डॉ राजेश बोळ अकोला , डॉ गजानन शर्मा बुलढाणा , डॉ सांखला डी पी जळगाव , डॉ विजय सरपे उमरगा , डॉ प्रविण पारकर अंबेजोगाई , श्री बडे बी जी औरंगाबाद , श्री ठोकळ एस आर औरंगाबाद श्री जर्हाड विजय जालना आदी जणांच्या स्वाक्षर्या आहेत.