Breaking News

तेलंगणातील रेल्वे ट्रॅक दुरुस्तीनंतर पुन्हा खचला, वाहतूक ठप्प

हैदराबाद, दि. 16 -  महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणातही मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाच्या पाण्याचा प्रवाहामुळे तेलंगणातील विकाराबाद- सदाशिवपेठ दरम्यानच्या रेल्वे मार्ग काल वाहून गेला होता. त्यानंतर काल रात्री ट्रॅक दुरुस्तही करण्यात आला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा एकदा हा ट्रॅक खचला आहे.
सध्या हा ट्रॅक पुन्हा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यामुळे या मार्गे जाणार्‍या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल रात्री ट्रॅक दुरूस्त करण्यात आला होता. त्यानंतर चाचणीसाठी रेल्वे पाठवण्यात आली होती. त्याचवेळी हा ट्रॅक पुन्हा खचला. दरम्यान, आज सकाळपासून पुन्हा एकदा युद्धपातळी दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र, ट्रॅकखालील माती वाहून गेली आहे. त्यामुळे ट्रॅक दुरुस्ती करण्यास वेळ लागत आहे.