Breaking News

पोपटराव पवार यांना ‘थिंक प्युअर’ पुरस्कार प्रदान



अहमदनगर (प्रतिनिधी) । 13
आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना पी.एन. जी. ज्वेलर्स व थिंक प्युअर फाऊंडेशनतर्फे आयोजित दाजीकाका गाडगीळ यांच्या 102 व्या जयंती सोहळ्यात थिंक प्युअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सिम्बॉयोसिसचे संस्थापक डॉ. शा. ब. मुजुमदार, पीएनजीचे सौरभ गाडगीळ उपस्थित होते.
या सोहळ्यात श्री. पवार यांच्याबरोबरच सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जेम ऑफ पुणे या पुरस्काराने तर पंडीत हृदयनाथ मंगेशर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षणतज्ञ डॉ. रजनी गुप्ते व उद्योजक मंगेश काळे यांनांही थिंक प्युअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेली 27 वर्षे हिवरे बाजार ग्रामस्थांनी संघटीतपणे पाण्यासाठी केलेल्या संघर्षामुळे गाव समृद्ध झाले म्हणूनच हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना पोपटराव पवार म्हणाले की, ज्यावेळेस शहरातील माणसांना पाण्याचे चटके समजतात, पाण्याचे भविष्यातील मुल्य लक्षात येते आणि त्यावेळी त्यांना गावाकडच्या माणसांचे पाण्याचे दु:ख जाणवते. पाण्याची किंमत ही कधीतरी सोन्यासारखी होती. याचे भान ठेवून हिवरे बाजार ग्रामस्थांनी पाणी समृद्धीचे काम केले म्हणूनच माझ्यासारख्या कार्यकत्यार्ंचा आज सत्कार होतोय याचा मला आनंद होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या दि. 24 एप्रिल 2016 च्या ’मन की बात’ मध्ये हिवरे बाजारमधील ग्रामस्थांनी केलेल्या पाणी व पिक नियोजनाचे कौतुक केले.