Breaking News

राष्ट्रवादी काँग्रसकडुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची मागणी

परभणी / प्रतिनिधी, दि. 29 - मागील चार वर्षा पासुन जिल्ह्यावर पडणार्‍या सततच्या दुष्काळा नंतर या वर्षी मुबलक प्रमाणात  सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर पिकाचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. परतीच्या पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे जिल्ह्यातील लागवडीच्या क्षेत्राला याचा चांगलाच फटका बसला आहे. सोयाबिन, मुग, कापुस या पिकांना अति पाण्याचा ताण बसल्यामुळे शेतातील काढणीला आलेले पिक जागेवरच नासुन गेले आहेत. सोयाबिनच्या शेंगांना कोंब फुटुन हातात आलेले पिक शेतकर्‍यांच्या हातातुन गेले आहे.जिल्ह्यात 12 सप्टेंबर पासुन पावसाने जोरदार हजेरी लावत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद प्रशासनाला घ्यायला भाग पाडले.पुर्णा, गंगाखेड, पालम, जिंतुर,पाथरी,सोनपेठ,सेलु आदि भागात मागील आठ वर्षाची रेकॉर्ड ब्रेक नोद झाली असुन या भागातील शेतकरी पावसाच्या अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या कृषी मंडळात अतिवृष्टी होऊन शेतातील उभ्य पिकांना कोंब,मोड फुटुन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.पाथरी तालुक्यामधील तसेच जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून प्रशासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशा आषयाचे निवेदन आ.बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकार्‍यांना देवून कोंब फुटलेले पिक प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात आणुन दाखवले. पुर्णा तालुक्यातुन दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादीचे प्रल्हाद होणमने,अतुल पाठक, पवनकुमार मुंदडा, विष्णु पाटील, सुरेंद्र रोडगे,शांतीलाल जाधव यांच्या स्वाक्षर्‍या  असुन आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या निवेदनावर गजानन आंबुरे पाटील, विष्णु नवले पाटील  आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.