अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांचे आर्थिक मदतीसाठी साकडे
परभणी, दि. 29 - जिल्ह्यावर मागील चार वर्षा पासुन सततचा दुष्काळ आपली वकृदृष्टी ठेवुन जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकासह शेतकर्याला नामोहरम करत होता.कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकर्यापुढे आत्महत्ये शिवाय कोणताही पर्याय निर्सगाने ठेवला नाही.पोटाची खळगी भरण्यासाठी कर्ज बाजारी झालेल्या अनेक शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला.सरकारनेही भरभरून मदत केली या वर्षी चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकर्यांनी आपली कंबर कसली व झालेही तसेच सुरूवातीच्या काळात कसाबसा झालेला पाऊस नंतरच्या काळात बर्यापैकी होत असतांना जिल्ह्यातील पिक परिस्थिती उत्तम होत चालली होती.पिके आपल्या माना जमीनीवर काढुन वातावरणाशी जुळवुन घेण्याचा प्रयत्न करत होते.परंतु येथेच घात झाला व दिड महिण्याच्या प्रर्दिघ प्रतिक्षे नंतर परतिच्या पावसाने जिल्ह्यावर परत एकदा आपली वकृदृष्टी केली व पाहता पाहता जिल्ह्यात पाण्याचा महापुर आला या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या हाता ताेंंडाशी आलेला घास हिरावुन घेतला. जिल्ह्यातील गोदावरी,पुर्णा,करपरा व छोट्या मोठ्या नदी नाल्याना पुराच्या पाण्याने वेढा दिला व शेतकर्यांच्या शेत शिवारात पाणीच पाणी झाले. पाण्याच्या अति ताणामुळे सोेयाबिनला आलेल्या शेंगा जागेवरच नविन आंकुर धरू लागल्या,दहा ते पंधरा दिवसाच्या पाण्याने शेतातील पिक नासुुन गेले आता उरल्या त्या परत एकदाच्या आर्त वेदना व हंबरडा फोडणारे टाहो...जिल्ह्यावर चार वर्षा नंतर परत एकदा ओला दुष्काळ पडला असुन अगोदरच पिक विम्यासाठी शासन दरबारी खेटे घालणार्या शेतकर्यांना आता ओल्या दुष्काळाच्या अनुदानासाठी रस्त्यावर येण्याची वेळ निर्सगाने आणुन ठेवली आहे.पाच वर्षाचा शेतकर्यांच्या पाठीमागचा ससेमिरा काही केल्या संपत नसुन एैन कैन प्रकारे निर्सगाने शेतकर्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यातुन अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी या साठी आंदोलने केली जात असुन परत एकदा पिकाचे पंचनामे करून अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.