Breaking News

उज्ज्वला राऊत यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

सातारा, दि. 29 - (प्रतिनिधी) : सातारा नगरपालिका शाळा क्र. 19 रिमांड होमच्या शिक्षिका उज्ज्वला बनसोडे-राऊत यांना नुकतेच आदर्श शिक्षिका या पुरस्काराने इनरव्हील क्लब ऑफ सातारा यांनी सन्मानित केले. सातारा जिल्ह्यातील 15 शाळांच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इनरव्हील क्लबचे अध्यक्ष वैशाली पाटील, सचिव शुभांगी पतंगे, इनरव्हील क्लबचे विभागीय अध्यक्ष गीता मामणिया यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उज्ज्वल राऊत या पदवीधर शिक्षिका असून त्यांना 2007 मध्ये पालिका शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात छतावरील पाणी संकलन या उपक्रमाला तृतीय पारितोषिक मिळाले होते. 2008, 2012-13, 2013-14, 2014-15, 2015-16 विविध स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाली आहेत. सामाजिक कार्यातही हिररिने सहभागी असतात. विद्यार्थीही घडवले आहेत. त्यांच्या या कामामुळे त्या विद्यार्थीप्रिय ठरत आहेत. इनरव्हील क्लबतर्फे सर्व शाळेत जावून पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी एक उपक्रम राबवला होता. सर्व निकषांमध्ये बनसोडे त्यांना चांगले गुण मिळाल्याने त्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्या जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागातील माहिती तज्ज्ञ अजय राऊत यांच्या पत्नी आहेत. त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, चंद्रशेखर जगताप, स्वच्छता विभागाचे धनाजी पाटील, संजय पवार, रवींद्र सोनावणे, गणेश चव्हाण, राजेश भोसले, रवींद्र कुलकर्णी, राजेश इंगळे यांनी अभिनंदन केले.