Breaking News

जयललिता यांचे मेत्तूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

चेन्नई, दि. 17 -  जिल्ह्यातील पीक सिंचनासाठी मेत्तूर धरणातून पाणी सोडण्याचा आदेश तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिले आहेत. 20 सप्टेंबरपासून मेत्तूर धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे आदेश आपण दिल्याचे जयललिता यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तामिळनाडूला 14 सप्टेंबरपर्यंत बिलिगुंडुलुमध्ये 8.92 टीएमसी फूट पाणी मिळाले होते.  राज्यातील शेतक-यांना पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता, त्यामुळे शेतक-यांना शेतीसाठी 64.30 कोटी रुपये देण्याची घोषणा गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी केली होती.