समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटातील आरोपी असीमानंदचा जामीन मंजूर
नवी दिल्ली, दि. 17 - समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असीमानंद याचा जामीन पंचकुला एनआयए न्यायालयाने मंजूर केला आहे. दिल्ली-लाहोर समझौता एक्सप्रेसमध्ये सूटकेसच्या मदतीने बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप असीमानंदवर करण्यात आला आहे. हा स्फोट 18 फेब्रुवारी 2007 रोजी घडवून आणला होता, यात 68 जणांचा मृत्यू झाला होता.
