Breaking News

गॅरेथ बॅटीचे 11 वर्षानंतर इंग्लंडच्या संघात पुनरागमन

लंडन, दि. 17 -  इंग्लंडचा फिरकीपटू गॅरेथ बॅटी 11 वर्षानंतर इंग्लंडच्या क्रिकेट संघात पुनरागमन करणार आहे. त्याची बांगलादेश दौ-यासाठी संघात निवड करण्यात आली आहे.
2003 साली बांगलादेशविरूद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात त्याने पहिला गडी बाद केला होता. आता पुन्हा याच संघाविरुद्ध होणा-या मालिकेमध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. 11 वर्षांनंतर पुनरागमन करणे हे आपल्याला एका स्वप्नाप्रमाणे आहे. गेल्या वर्षी जफर अन्सारी दुखापतग्रस्त झाल्यानंतर आपल्याला संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र निवड समितीने त्यावेळी समित पटेलची निवड केली. त्यामुळे आपसी संधी हुकली होती, असे बॅटी यावेळी म्हणाला.