जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत मुख्यालयाच्या पुरुष संघ विजेता; सातारा विभागाच्या महिला संघ विजेता
सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : 44 व्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधरण विजेतेपद मुख्यालय पुरुष संघाने तर महिलांमधील सर्वसाधारण विजेतेपद सातारा विभागाच्या संघाने पटकविले. मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवून 44 व्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिपक हुंबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, नीता पाडवी, यशवंत काळे, रमेश चोपडे, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक पांडूरंग सूर्यवंशी उपस्थित होते.
ताणतणाव कमी करत आरोग्य चांगले राहण्यासाठी क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात. अशा क्रीडा स्पर्धांमधून सांघिक भावना वाढीस लागते. स्पर्धेच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होते. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला खेळाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे खेडाळूंची चांगली सोय होणार असून यातून नवीन खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल. पुढील वर्षी होणार्या हील मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत-जास्त अधिकारी, कर्मचार्यांनी सहभाग घेण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आवाहन केले.
44 व्या सातारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेतील विजेतेसंघ पुढीलप्रमाणे :- पुरुष संघांमध्ये 100 मिटर धावणे मुख्यालय- विपीन ढवळे, फुटबॉल- सातारा विभाग, हॉकी- सातारा विभाग, व्हॉलीबॉल-सातारा विभाग, बास्केटबॉल- फलटण विभाग, हॅण्डबॉल- फलटण विभाग, खो-खो- फलटण विभाग, कबड्डी- सातारा विभाग, ज्युदो- मुख्यालय विभाग, कुस्ती- मुख्यालय विभाग, बॉक्सींग-मुख्यालय विभाग, वेटलिफ्टिींग-सातारा विभाग, जलतरण- मुख्यालय विभाग, क्रॉस कंट्री- मुख्यालय विभाग, अॅथलॅटीक्स्-मुख्यालय विभाग. महिलांच्या संघामध्ये व्हॉलीबॉल- मुख्यालय विभाग, बास्केटबॉल-सातारा विभाग, खो-खो- मुख्यालय विभाग, कबड्डी- सातारा विभाग, ज्युदो-सातारा विभाग, कुस्ती-सातारा विभाग, बॉक्सींग-सातारा विभाग, वेटलिफ्टिंग-सातारा विभाग, क्रॉस कंट्री- सातारा विभाग, अॅथलॅटीक्स्- सातारा विभाग. बेस्ट अॅथलिट महिला- प्रियंका गायकवाड, बेस्ट अॅथलिट पुरुष- अमोल गिरी यांनी पटकवला. या सर्व विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.