Breaking News

दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरची आत्महत्या

नवी दिल्ली, दि. 17 - दिल्लीतील एम्सच्या एका महिला डॉक्टरने स्वत:ला इंजक्शन लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऋतू बनकोटी असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. मृत महिलेचा पती आपल्याच मुलीचा छळ करत असल्याचे तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मृत महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
डॉ. ऋतू या एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भूल विशेषज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्या आपला पती, मुलगी आणि सासू-सास-यांबरोबर दिल्लीतील कुर्माचल अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. बुधवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्यानंतर त्यांच्या पतीने त्यांना निघून जाण्यास सांगितले. गुरूवारी पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. त्या फोनला त्या उत्तर देत नसल्याने आपण घरी जाऊन पाहिले. तेव्हा त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या असल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली. दरम्यान त्वरीत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.