मी असेपर्यंत पक्षात फूट पडणार नाही : मुलायमसिंह यादव
लखनऊ, दि. 16 - मी असेपर्यंत समाजवादी पक्षात फूट पडू शकणार नाही, अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्यात कोणतेही वाद नाहीत, असं समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील यादवीनं कळस गाठला आहे. मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यादव यांच्यावर नाराज असलेले शिवपाल यादव यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र हा राजीनामा मुलायम सिंहांनी स्वीकारला नाही.
मुलायमसिंह यादव यांचे सख्खे बंधू शिवपाला यादव आणि मुलायमसिंहांचे पुत्र, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात धुसफूस सुरु आहे. मुलायमसिंहांचे चुलतभाऊ रामगोपाल आणि अखिलेश यादव हे एका बाजूला आणि मुलायमसिंह आणि शिवपाल हे दुसर्या बाजूला असा संघर्ष आहे. शिवपाल यांच्या घराबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी केली. शिवपाल यांनी समाजवादी पक्षातील पदांचा राजीनामा दिल्यानं समर्थक नाराज झाले. तसंच यादव कुटुंबातील पक्षाचे महत्वाचे सदस्य रामगोपाल यांना हटवण्याची मागणी शिवपाल समर्थकांनी केली. तर दुसरीकडे रामगोपाल को बाहर करो अशी घोषणाबाजी शिवपाल यांच्या समर्थकांनी केली. नेताजींना म्हणजेच मुलायमसिंहांना जाऊन भेटा आणि त्यांच्यासमोर तुमची बाजू मांडा अशी साद शिवपाल यांनी समर्थकांना घातली. गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह आणि अखिलेश यांच्यातून विस्तवही जात नाही.मुलायम यांच्या बाजूनं असणार्या शिवपाल यांच्या पक्षातील बर्याच अधिकारांवर अखिलेश यादवांनी गदा आणण्यास सुरुवात केल्यानं युद्धाचा भडका झाला आहे.