Breaking News

माहिती अधिकार कार्यकर्त्यावर हल्ला

नाशिक, दि. 29 - माहिती अधिकार कार्यकर्ता विशाल सुधाकर गंगापुत्र यांच्यावर गुंडांनी हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराजवळच ही घटना घडली. त्र्यंबकेश्‍वरलगतच्या पाचाळी येथे राहणारे गंगापुत्र हे माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे तालुकाध्यक्ष असून, त्यांनी शासकीय भ्रष्टाचारासंदर्भात विविध कागदपत्रे जमा केले होते. गंगापुत्र आजपासून पाथर्डी फाटा येथे बेमुदत उपोषणास बसणार होते. पहाटे उपोषणासाठी निघत असताना पावणेपाचच्यादरम्यान काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. पाठीवर चॉपरने वार करत लोखंडी दांडक्याने मारहाण करत त्यांना जखमी केले. तसेच, त्यांच्याजवळील पेनड्राइव्ह, सीडीज, फाइल असा मुद्देमाल चोरून नेला. हल्ल्यानंतर गंगापुत्र यांनी आरडाओरड करताच त्यांचे कुटुंब मदतीसाठी येताच गुंडांनी पळ काढला. गंगापुत्र यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.