दोन महिन्याच्या आत औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाची बैठक - मुख्यमंत्री
औरंगाबाद, दि. 18 - येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये नियोजीत असलेली मंत्रीमंडळाची बैठक औरंगाबादला घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद येथे आलेले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृह येथे विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी निवेदने देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यावेळी उपस्थित होते. गेल्यावर्षीच मराठवाड्यामध्ये मंत्रीमंडळाची बैठक घेण्याचे नियोजन होते मात्र दुष्काळामुळे ती बैठक पुढे ढकलण्यात येवून मंत्री महोदयांनी मराठवाड्यातील तालुक्यांचा दौरा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मंत्र्यांनी मराठवाड्यातील तालुक्यांचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली . यावर्षी पाऊस चांगला झालेला असून येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात येईल, असे सांगून श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, या बैठकीपूर्वी मराठवाडा विकासाच्या समस्यासंदर्भात मराठवाडा विकास जनता परिषदेसह इतर संस्था, संघटनांशी चर्चा केली जाईल. यावेळी विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर केली.