शेतकर्यांचं समुपदेशन करा, आयजींच्या सूचनेने पोलिस कचाट्यात
नागपूर, दि. 13 - पोलिसांची नेमकी जबाबदारी काय..? गुन्हेगारी रोखणे की शेतकर्यांचं समुपदेशन करणे. हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे अमरावती परिक्षेत्राचे आयजी विठ्ठल जाधव यांनी पोलिसांसाठी काढलेलं अजब फर्मान. जाधवांनी अमरावती विभागातील पोलिसांना शेतकरी आत्महत्या रोखण्याचा पाच कलमी कार्यक्रमाला जुंपलं आहे.
पोलिसांची मुख्य जबाबदारी असते ती, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची. पण, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना पोलिसांवर वेगळ्याच कामाचा भार टाकला आहे.
पोलिसांची मुख्य जबाबदारी असते ती, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची. पण, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना पोलिसांवर वेगळ्याच कामाचा भार टाकला आहे.