जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील जागांच्या आरक्षणा बाबत बुधवारी सोडत कार्यक्रम
नांदेड दि. 29 :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-2017 साठी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहित पद्धतीने आरक्षणासाठी बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सोडत काढण्यात येणार आहे.
नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून ( सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) महिलांचे आरक्षण जागासाठींची ही सोडत जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्याबाबतीत बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. तसेच पंचायत समिती निर्वाचक गणांच्याबाबतीत संबंधीत तालुक्याच्या मुख्यालयी 5 ऑक्टोंबर 2016 रोजी तहसिल कार्यालयामार्फत सोडतीने काढण्यात येणार आहे.
याबाबतचा सविस्तर कार्यक्रम व तपशील जिल्हाधिकारी कार्यालय-नांदेड, सर्व तहसिल कार्यालये, जिल्हा परिषद-मुख्यालय नांदेड, पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस फलकावरही लावण्यात आलेला आहे. इच्छुकांनी या सोडतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्रारुप निवडणूक विभाग तसेच पंचायत समिती प्रारुप निर्वाचक गणांची प्रभागरचना सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर गुरुवार 20 ऑक्टोंबर 2016 पर्यंत हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्विकारल्या जाणार आहेत, याचीही संबंधितांनी नोंद घ्यावी असेही आवाहनही करण्यात आले आहे.