मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी
उस्मानाबाद, दि. 29 - मराठवाड्याचा दुष्काळ यंदाच्या पावसाने धुऊन लावला असला तरी नैसर्गिक आपत्तीने मात्र 70 बळी घेतले आहेत. यामध्ये पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात 70 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अतिवृष्टीने मराठवाड्यात 569 जनावरे दगावली. तर 3 हजार 998 घरे, झोपड्या, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 19 ठिकाणच्या खाजगी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या नुकसानीचा आकडा 31 लाख 48 हजार एवढा आहे. मात्र आनंदाची बाब म्हणजे मराठवाड्यातल्या सर्वच प्रकल्पात मिळून 60 टक्के पाणी साठा झाला आहे. मराठवाड्यात वीज पडून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुरात वाहून गेल्याने विविध जिल्ह्यात 33 जणांना आपला जीव गमवावा लागला.