अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह 43 आमदारांचा काँग्रेसला रामराम
गुवाहाटी, दि. 17 - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह 43 आमदारांनी काँग्रेसला रामराम करत ‘पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल’ (पीपीए) मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेससमोरील अडचणींत वाढ झाली आहे.
60 सदस्य असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 46 आमदार व भाजपचे 11 सदस्य होते. श्री. खांडू म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना भेटून आम्ही काँग्रेसचे पीपीएमध्ये विलिनीकरण केल्याचे सांगितले आहे. राज्यात काँग्रेसमधील 46 पैकी 43 आमदारांनी पीपीएमध्ये प्रवेश केला आहे, असे श्री. खांडू यांनी सांगितले. पीपीएची स्थापना 1979 मध्ये झाली होती. पीपीए 10 प्रादेशिक पक्ष मिळून नॉर्थ-इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचा एक घटक आहे. याची स्थापना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मे 2016 मध्ये केली होती. सध्या आसाममधील भाजपचे नेते हेमंता विश्व सरमा हे या आघाडीचे प्रमुख आहेत. नाबाम तुकी हे आता अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये असलेले एकमेव आमदार आहेत. नाबाम तुकी हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पण जानेवरी 2016 मध्ये काँग्रेसचे सरकार पडले. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.