Breaking News

पाकिस्तानमध्ये मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील मृतांचा आकडा 28 वर

कराची, दि. 17 -  वायव्य पाकिस्तानमधील एका मशिदीमध्ये आत्मघातकी हल्ल्यातील मृतांचा आकडा 28 वर पोहोचला आहे. हा हल्ला शुक्रवारी मशिदीत नमाज पठणाच्या वेळी घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.