Breaking News

हीरो समूह बँकींग क्षेत्रात उतरणार ?

नवी दिल्ली, दि. 17 -  आगामी काळात हीरो समूह बँकींग क्षेत्रात उतरण्याची शक्यता आहे. हीरो माटोकॉर्पचे अध्यक्ष पवनकांत मुंजाल याबाबत रिझर्व्ह बँकेत अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
देशभरात आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनीने 1 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक क्रिस कॅपिटलने केली आहे. तर क्रेडिट सुईसने 132 कोटी आणि हीरो समुहाने 300 कोटी हीरो समूहाने हीरो फिनकॉर्पमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.