पुण्यात विसर्जन मिरवणुकीत 1000 हून जास्त मोबाईल चोरीला
पुणे, दि. 16 - पुण्यातील गणपीत विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी डाव साधला. विसर्जनाच्या दिवशी बेलबाग चौक ते अलका चौक या परिसरात तब्बल एक हजारहून अधिक मोबाईलची चोरी झाल्याचं उघड झालं आहे.
पुण्यात काल संपूर्ण दिवसभरात बेलबाग चौक ते अलका चौक परिसरात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये 1000 पेक्षा जास्त मोबाईलची चोरी झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 20 मोबाईल्स जप्त केले आहेत. तर इतर चोर आणि मोबाईलचा तपास सुरु आहे.