Breaking News

संघटनांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात

। दत्ता जाधव यांचे प्रतिपादन

अहमदनगर, दि. 27 - आज वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया, दाखले, महाविद्यालयांचा आठमुठेपणा, अवास्तव फी, फसवणुक आदिंमुळे विद्यार्थी अगदी हैराण होवून जातात. त्यांना अभ्यासापेक्षा या गोष्टींचेच जास्त टेन्शन येते. त्यामुळे विद्यार्थी अधिकार परिषदेच्यावतीने वेळोवेळी कार्यशाळेसारखे उपक्रम आयोजित करुन यासंबंधित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. विशाल लोळगे व त्यांच्या सहकार्‍यांनी यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन नंदनवन मित्र मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव यांनी केले.
मानवाधिकार जनआंदोलन प्रणित विद्यार्थी अधिकार परिषदेच्या शहराध्यक्षपदी विशाल लोळगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने दत्ता जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विकास पटवेकर, आदेश जाधव, डॉ.संतोष साळवे, विकी गायकवाड, संकेत खेतमाळस, ईलास शेख, सोमा बंदिवान, अभिजित गोंधळे, शंकर बंदिवान, अन्वर शेख, कुणाल गवळी आदि उपस्थित होते.
यावेळी सत्कारास उत्तर देतांना लोळगे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नासाठी आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून, दत्ता जाधव यांनी केलेल्या आवाहनानुसार लवकरच कार्याशाळेचे आयोजन करु. शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थीनींना होत असलेल्या छेडछाडीबाबतही संघटनेच्या माध्यमातून त्यास पायबंद घालण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले.