Breaking News

पुर्णकन्या प्रतिष्ठानची मेकअप कार्यशाळा संपन्न

अहमदनगर, दि. 27 - कोणतेही क्षेत्र असो त्यामधील नवीन येणारे आधुनिक प्रशिक्षण घेणे हि गरज आहे ते त्या क्षेत्रातील लोकांनी घेणे गरजेचे आहे असे नाही तर त्याचा वापर करणार्‍यांनी पण माहिती घेतली पाहिजे प्रतिपादन फिल्म मेकअप आर्टिस्ट अनुजा कांबळे यांनी पारनेर येथील पूर्णवाद परिवाराच्या पूर्णकन्या प्रतिष्ठानने आयोजित श्रीकृष्ण जन्मोत्सव व नृत्यसंमेलन या 3 दिवसीय उपक्रमात मेकअप कार्यशाळा मध्ये बोलताना केले.
याप्रसंगी पूर्णकन्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विभावरी कुलकर्णी, क्षमा बिंदू , दीपाली मुळे , सारिका लोंढे , शिल्पा सुदामे यांच्यासह मोठया संख्येने युवती व महिला उपस्थित होत्या .या कार्यशाळेत उत्कुष्ट पद्धतीने अनुजा कांबळे यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून पर्सनल मेकअप,ऑफिशियल मेकअप व पार्टी मेकअप करून दाखविले तसेच साडी ड्रेपिंगचे व हेअर स्टाईलचे प्रकार शिकवले, स्वताचा मेकअप स्वता कसा कमी वेळेत करावयाचा हे उपस्थितांना शिकवले .मोडेल म्हणून मीनल देशमुख , शिल्पा आरळकर व इशिता कुलकर्णी या होत्या . यावेळी युवतींनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन कांबळे यांनी त्याचे शंका -समाधान केले अनुजा कांबळे या अनेक वर्षा पासून मराठी फिल्म मेकअप आर्टिस्ट असून त्यांनी 12 सिनेमाचे मेकअप केले आहे त्या स्पार्कल मेकअप स्टुडीओ पुणे व अहमदनगरच्या संचालिका असून ब्रायडल मेकअ , फैशन शो , हेअर स्टाईलचा त्यांना 15 वर्षापासून चा अनुभव आहे . मेकअप आणि हेअर स्टायलिंग मध्ये ज्यांना करिअर करवयाचे आहे व स्वताचा मेकअप स्वता करावयास शिकायचे आहे तसेच गणपती व नवरात्रामध्ये ज्या महिला मंडळांना मोफत मेकअप कार्यशाळा घायवयाचा आहे त्यांनी स्पार्कल मेकअप स्टुडीओ ,सातभाई,दिल्लीगेट, स्टेट बँकेच्या शेजारी , अहमदनगर , मो . 9822118913 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.