Breaking News

आयएमएसमध्ये संगणक दिन उत्साहात साजरा

पारितोषिक वितरणा समारंभ संपन्न

अहमदनगर, दि. 27 - 20 ऑगस्ट या जागतिक संगणक दिनानिमित्त आय.एम.एस. अहमदनगर या संस्थेमध्ये ‘फेस्ट-डेअर-टेक’ या जिल्हा पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा पदवी विभागातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सी-प्रोग्रामिंग, वेब डेव्हलपमेंट, अ‍ॅप्टीट्युड टेस्ट, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, ग्रुप डान्स, क्वीझ या स्पर्धा घेण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यातील 17 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन आय.एम.एस.संस्थेचे सरसंचालक डॉ.शरद कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. तर पारितोषिक वितरण समारंभ संचालक डॉ.एम.बी.मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ एक्सलन्स’चे पारितोषिक न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज’ यांना मिळाले तर ‘एन्युजियॅस्टिक पार्टीसीपेशन आऊटसाईड सिटी’ हा पुरस्कार सी.डी.जैन कॉलेज, श्रीरामपूर यांना मिळाला.
पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी डॉ.एम.बी.मेहता म्हणाले की, मागील आठ वर्षांपासून आयएमएस संस्था संगणक दिवस साजरा करत आहे. आजच्या या संगणक युगात विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धींगत करण्यासाठी असे उपक्रम आयएमएसमध्ये नेहमीच राबविले जातात. 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अक्षय राजपुरे व मृणाल साखरे यांनी केले तर आभार संगणक विभागप्रमुख डॉ.उदय नगरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगणक विभागातील व आयएमएस मधील सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.