Breaking News

राजन, अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

नवी दिल्ली, दि. 27 - भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर भाजपाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राजन व सुब्रमण्यम ही व्यवस्थापन पदवी मिळवलेली व अमेरिकेने भारतात घुसवलेली अत्यंत कोत्या मनाची माणसं आहेत, अशा शेलक्या शब्दांत स्वामी यांनी टीका केली आहे.
विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कमी केले नाही म्हणून स्वामी यांनी राजन यांच्यावर आधीही जोरदार टीका केली आहे. सीईए सुब्रमण्यम यांनी भारताने आयपीआर निकषांचा भंग केल्यामुळे अमेरिकन सरकारने भारतावर कारवाई करावी, अशी शिफारस केली होती. त्यासाठी स्वामी यांनी सुब्रमण्यम याना लक्ष्य केले आहे. राजन आणि सुब्रमण्यम यांच्यासारखे पदवीधारक अमेरिकेने भारतात घुसवले आहेत. ही व्यवस्थापन क्षेत्रातील कोत्या मनाची माणसं आहेत, असे स्वामी म्हणाले.