भारतातील जनुकीय कापूस बियाणे प्रकल्प मोन्सॅन्टोने सोडला
नवी दिल्ली, दि. 27 - भारतात जनुकीय सुधारित जंतुविरोधी कापूस बियाणे लागवडीचा बेत मोन्सॅन्टो या अमेरिकेतील जैविक तंत्रज्ञानातील मातब्बर कंपनीने सोडून दिला आहे. कंपनीने गुरुवारी सांगितले की, या संदर्भात सरकारकडे दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे.
नियामकांकडून अनिश्चिततांमुळे आम्ही हा प्रकल्प सोडल्याचे कंपनीने सांगितले आहे. 70 लाख भारतीय कापूस उत्पादकांना याचा फटका बसणार आहे. भारतात सुधारित जनुकीय कापूस बियाणांच्या व्यावसायिक लागवडीसाठी पर्यावरणाची मंजुरी हवी होती. त्यासाठीचा अर्ज मॉन्सॅन्टोने मागे घेतला आहे. भारतात सुधारित जनुकीय बियाणे लागवडीचा प्रकल्प स्थगित करण्याचा आमचा निर्णय व्यवसायातील नियामक पर्यावरणातील अनिश्चिततेचा परिणाम आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. भारतातील 70 लाख कापूस उत्पादक शेतकर्यांना या निर्णयाचा फटका बसणार असून गेल्या दशकभरात सुधारित जनुकीय बियाणांमुळे त्यांच्या जीवनमानातच चांगला बदल झाला होता. त्यांना आता पुढील पिढीचे कीटकनाशक प्रतिरोधी तंत्रज्ञान घ्यावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्येच भारतातील कंपनीचे पेटंट असलेले बोलगार्ड जनुकीय तंत्रज्ञान वापरणा-या खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून मोन्सॅन्टोला दिल्या जाणा-या रॉयल्टीच्या रकमेत 70 टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कंपनीने भारतातील आमच्या प्रत्येक व्यवहाराचे आम्हाला फेरमूल्यांकन करावे लागेल, असा इशाराही दिला होता. मोन्सॅन्टो स्थानिक बी-बियाणे उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादनासाठी आपले जीएमओ तंत्रज्ञान विक्रीसाठी देत असते. भारतातील खासगी बियाणे कंपन्यांशी केलेल्या करारांमध्ये भारत सरकारच्या हस्तक्षेपाला आव्हान देणारी याचिकाही मॉन्सॅन्टोने दाखल केली आहे.