शहरात महिला व युवतींसाठी स्वतंत्र बस
अहमदनगर (प्रतिनिधी) । 27 - महिला व युवतींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण देण्याच्या हेतूने शहर बस सेवा चालवणार्या यशवंत अॅटो या संस्थेच्या वतीने महिला व युवतींसाठी सुरु करण्यात आलेल्या स्वतंत्र बस सेवेचा शुभारंभ शुक्रवारी आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला.
माळीवाडा जुने बस स्थानक शेजारी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी यशवंत अॅटो चे संचालक तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गाडे, सुर्यकांत (अण्णा) गाडे, घनश्याम घोलप, प्रशांत साठे, रावसाहेब काकडे, रामेश्वर चेके, घिगे आदिंसह महिला प्रवासी उपस्थित होत्या.
महिला व युवतींवर वाढते अत्याचार, सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान होणारी छेडछाड हा गंभीर प्रश्न सध्या भेडसावत आहे. शिक्षण, नोकरी अथवा इतर कारणांनी घराबाहेर पडणार्या महिलांना प्रवासासाठी सुरक्षितता देण्यासाठी यशवंत अॅटोच्या माध्यमातून महिला व युवतींसाठी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्यात आली आहे.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, घरा बाहेर महिला पडली की, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न घरच्यांना भेडसावत असतो. मात्र यशवंत अॅटोने महिलांसाठी केलेल्या स्वतंत्र्य बससेवेने महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न मिटणार आहे. संस्थेचे संचालक धनंजय गाडे यांच्या वाढदिवसा निमित्त महिला व युवतींसाठी सुरु करण्यात आलेली बस सेवेचा उपक्रम प्रशंसनीय आहे. शहर वासियांना यशवंत अॅटोच्या माध्यमातून उत्तम बस सेवा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रवासी महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.