Breaking News

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर विजय

कोलंबो, दि. 25 - कसोटी मालिकेतील विजयापाठोपाठ श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेतही विजयी श्रीगणेशा केला. दमदार फलंदाजीनंतर थिसरा परेराची मध्यमगती आणि अमिला अपोन्सोच्या डावखुर्‍या फिरकीने ऑस्ट्रेलियाला निष्प्रभ केले. कुशल परेरा, एंजेलो मॅथ्यूज आणि कुशल मेंडीस यांच्या अर्धशतकी खेळीने श्रीलंकेला 288 धावांची मजल मारता आली. जेम्स फॉकनरने शानदार हॅटट्रिक केली. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज ठरला. त्यानंतर 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 47.1 षटकांत 206 धावांत संपुष्टात आला. मॅथ्यू वेडने (76) एकाकी खेळी केली. श्रीलंकेच्या अपोन्सो याने 18 धावांत 4 गडी बाद केले. थिसरा परेराने 33 धावांत तीन गडी बाद केले.