कर्जतसह जिल्ह्यात सर्वपक्षीय आंदोलने
कर्जत येथील कोपर्डी गावातील घटनेचे तिव्र पडसाद
कर्जत, दि. 17 - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून खुन केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा होण्याबाबत दि.16 जुलै 2016 शनिवार रोजी कर्जत, पाथर्डी, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, शेवगांव सह विविध ठिकाणी आंदोलन तसेच निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवुत्ती वाढत असुन महिलांवरील अन्याय,
अत्याचार, बलात्कार या घटनेत वाढ होत आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणार्या घटना घडत आहे. असे क्रुरकुत्य करणार्या गुन्हेगारास जात नसते गुन्हेगार हीच त्याची जात असते.अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा समाजात घडु नयेत म्हणुन आरोपीस फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तसेच इतर आरोंपीना अटक करुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाववावे, तसेच सरकारच्या वतीने उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, मुलीच्या घरच्यांना 25 लाख रुपये देण्यात यावे, पिडीत मुलीच्या घरचे दहशतखाली असुन त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे आदि मागण्याचे निवेदन यावेळी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाभर देण्यात आले आहे.
कर्जत प्रकरणानंतर पालकमंत्री प्रा.राम शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे, राजेश परकाळे, गोरख दळवी, संजीव भोर, अवधुत पवार, सोमनाथ कराळे आदिंनी भेट घेतली.
