Breaking News

स्वच्छ कारभाराची प्रतिज्ञापत्रे अण्णांकडे सादर

पारनेर (प्रतिनिधी) । 17 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर तालुका सैनिक बँकेत स्वच्छ कारभार करण्याचे प्रतिज्ञापत्रेच वंदे मातरम् मंडळाच्या उमेदवारांनी शुक्रवारी अण्णा हजारे यांच्याकडे सादर केली. अण्णा हजारे यांनीही बॅँकेत सेवाभावी व स्वच्छ कारभार करणारी व्यक्ती गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
अण्णा हजारे यांनी पारनेर तालुका सैनिक बँकेची स्थापना
केली आहे, परंतु त्यांनी त्यात कधीही हस्तक्षेप केला नाही. आता बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. त्यात वंदे मातरम् मंडळाकडून कॅ. विठ्ठल वराळ, बाळासाहेब नरसाळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. त्यांच्या मंडळाने अण्णा हजारे यांना अभिप्रेत असणारा स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार केली आहेत.
शुक्रवारी राळेगणसिद्धीत वंदे मातरम् मंडळाचे प्रमुख बाळासाहेब नरसाळे, संजय वाघमारे, कॅ. विठ्ठल वराळ यांच्यासह भाऊसाहेब गवळी, भाऊसाहेब भुजबळ, विठ्ठल कवाद, डॉ. सादीक राजे, रावसाहेब बुचुडे, दादा पठारे, जगन्नाथ खामकर, बाळासाहेब गुंजाळ व उमेदवार उपस्थित होते. अण्णा हजारे यांनीही स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार बँकेत असणे आवश्यक असून सेवाभाव जपला पाहिजे, असे मत व्यक्त केले.