Breaking News

फॅशन डिझायनिंग क्षेत्रामुळे आत्मनिर्भय बनू शकतात

 । आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन 

अहमदनगर, दि. 17 - नगर-मनमाड रोडवरील, पराग प्लाझा, सावेडी येथील इंडियन फॅशन अ‍ॅकॅडमीचे वार्षिक पारितोषिक वितरण आ. संग्राम जगताप व यशश्री अ‍ॅकॅडमीच्या संचालिका अनुरिता शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अ‍ॅकॅडमीच्या संचालिका रचना काकडे, नितीन काकडे, तसेच न्यू आर्टस् महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. अशोक देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यास मोठा वाव आहे. या क्षेत्रामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आत्मनिर्भर बनू शकतात, असे सांगितले. अनुरिता शर्मा म्हणाल्या की, महिला व युवतींना करिअर करण्यासाठी आज अनेक क्षेत्रे उपलब्ध असली, तरी डिझाईनिंग क्षेत्र हे वेगळे क्षेत्र ठरू शकते. यामध्ये महिलांची आवड जोपासली जाईल, शिवाय डिझाईनिंग क्षेत्रा अर्थाजर्नाचे महत्त्वपूर्ण साधन ठरू शकते, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा. अशोक देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली काकडे यांनी केले, तर आभार अ‍ॅकॅडमीच्या संचालिका रचना काकडे यांनी मानले.
या कार्यक्रमानिमित्त अ‍ॅकॅडमीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.  विद्यार्थ्यांनी बेस्ट डिझाइनर, बेस्ट स्टुडंटस्, बेस्ट मॉडेल, बेस्ट अचिव्हमेंट आदी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. अ‍ॅकॅडमीत शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या माजी विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.