सेवानिवृत्त कर्मचार्यांची मेडिकल इन्शुरन्स उतरवून मोफत आरोग्य तपासणी करणार
। मनपातील 22 सेवानिवृत्तांचा सत्कार संपन्न
अहमदनगर, दि. 11 - सेवानिवृत्त कर्मचार्यांना मी न्याय देण्याचे काम केले आहे. सेवा निवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागा भरून काढली जात नाही. त्यामुळे प्रशासनावर ताण पडत आहे. शासनाने आकृतीबंध मंजूर केल्यामुळे पुढील काळात कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांची मेडिकल इन्शुरन्स उतरवून मोफत आरोग्याची तपासणी करणार अशल्याचे प्रतिपादन अहमदनगर मनपा कर्मचारी कल्याण निधीचे अध्यक्ष व उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.अहमदनगर महानगरपालिकेा कर्मचारी कल्याण निधीच्या वतीने सेवानिवृत्त 22 कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चारठाणकर बोलत होते. याप्रसंगी कल्याण निधीचे सचिव शेखर देशपांडे, सहा. आयुक्त अशोक साबळे, सुरेखा सग्गम, विजय बोधे, गोसावी, होलम, आढाव, शेख, कुरलिया आदी उपस्थित होते.
चारठाणकर पुढे म्हणाले की, मनपा आपले एक कुटुंब आहे. तुमच्या अनुभवाचा उपयोग मनपाला करून द्या. सेवानिवृत्तीनंतर मनपाला मदत करा. त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. मनपात एका व्यक्तीकडे 4 ते 5 विभागांचा कारभार आहे. त्यामुळे काम करण्यात प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडत आहे. यातून चांगले काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.
शेखर देशपांडे म्हणाले की, पूर्वी या कार्यक्रमास वेळ लागे. परंतु उपायुक्त चारठाणकर अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी कल्याण निधीचे अध्यक्ष झाल्यानंतर वेळेवर सन्मान करायचे ठरविले. त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील लाभ वेळेत मिळवून देण्याकामी चांगली भूमिका बजावली, असे ते म्हणाले.यावेळी सर्वांनी आपले मनागेत व्यक्त केले.
