Breaking News

सहकार्य फाऊंडेशन तर्फे सिंधी कॉलनीत वृक्षारोपण

बुलडाणा, दि. 08 - आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. मझाडे लावा झाडे जगवाफ हा मूलमंत्र जपला पाहिजे. दि. 06/07/2016 रोजी सहकार्य फाउंडेशन ने आनंद बहुदेशीय संस्था द्वारा संचालित झूलेलाल बाल उद्यान येथे वृक्षारोपण केले. सध्याच्या काळात पर्यावरण हा विषय सर्वसमान्यांपासून ते सर्व राज्यकार्यकर्त्यापर्यंत महत्वाचा विषय झालेला आहे. सतत वेगाने वाढत असलेली लोकसंख्या औद्यगिकीकरण यामुळे वनांचा नाश होत आहे. पर्यावरण वाचवण्याचे काम सर्वानी हाती घेण्याची गरज निर्माण झाली असून या राष्ट्रीय कार्यात सहकार्य फाऊंडेशनने खारीचा वाटा उचलण्याचे काम गेल्या 2 वर्षांपासून हाती घेतले आहे.
आज सकाळीच संत झुलेलाल बाल उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. ही झाडे जगावी याकरिता त्यांना लाकडी ट्रीगार्ड लावण्यात आले. यावेळी सदर वृक्षरोपण कार्यक्रमारिता चिखली शहरातील मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वसुसाहेब, नामवंत दंतरोग तज्ञ डॉ.उदय बोंद्रे, बालरोगतज्ञ डॉ.शिवशंकर खेडेकर, पत्रकार विनोद खरे, आनंद बहु. संस्थेचे विनोद नागवाणी, प्रेम गुरूदासाणी, धिरज गोलानी, ढालुमल परियाणी, दयारामसेठ मुलचंदानी, वसंत भोजवाणी, शंकर भोजवाणी, विशाल गुरूदासाणी, हरिश नागवाणी यांच्यासह सहकार्य फाऊंडेशनचे  सदस्य प्रा. नितिन वर्‍हाडे ,सूचित भराड, चेतन नागवानी, जयंत चव्हाण, प्रसाद सोळंकी, आयुष कोठारी, निलेश भुसारी, सुनिल भराड, आशिष गोलाणी, कुणाल नागवाणी, निखील खरपास, पंकज भारद्वाज, प्रणव कोठारी उपस्थित होते.