Breaking News

दुर्गजागृती व्याख्यानमालेत प्रा.केशव उगले यांची 12 जुलैला व्याख्याने

नाशिक/प्रतिनिधी। 8 - शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने येत्या मंगळवार 12 जुलै 2016 रोजी सायंकाळी 6 वाजता दुर्गअभ्यासक प्रा.केशव उगले यांचे शिवरायांच्या मुलखातील गडकोट हिंडताना या विषयावर व्याख्यान होणार आहे.नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्या समोरील प्रांगणात हिदुर्ग जागृत्ती व्याख्यानमाला होणार आहे .या प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील 70 हून अधिक गड्कील्ल्यांचा वारसा दाखवणारी पोस्टर प्रदर्शनी तसेच जेव्हा गड बोलू लागला हा एकपात्री प्रयोग सादर केला जाणार आहे.
गडकिल्ल्यांचा ऐतीहासिक वारसा, गडकोटांची सध्यस्थिती समाजाला कळावी. या दृष्टीने जागृती होनेकामी गेल्या 4 वर्षाहून अधिक काळापासून जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर श्रमदानाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन, वनसंवर्धन,जलसंवर्धन कार्य करणार्‍या शिवकार्य गडकोट मोहिमेच्या माध्यमातून जिल्हाभर दुर्गजागृती अभियान एकपात्री, पोस्टर, व्याख्याने, चर्चासत्र या माध्यमातून राबविले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात दुर्ग जागृती व्याख्यानमाला गेल्या जानेवारीपासून दर महिन्याच्या 12 तारखेला नित्यक्रमाने सुरु आहे.या वेळी या व्याख्यानाचे 7 वे पुष्प असणार आहे.
या व्याख्यानमालेत मोठ्या संखेनी शिवभक्तानी, दुर्गभक्तानी उपस्थित राहावे. असे आवाहन शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने करण्यात आले आहे .