रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा आरक्षीत करून द्या - डॉ. सत्येंद्र भुसारी
बुलडाणा, दि. 08 - रमाई योजनेअंतर्गत घरकुलासाठी स्वत:ची जागा नसल्याने श्शासनाने घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दयावी अशी मागणी चिखली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी व काँग्रेस पदाधिका-यांनी केली.
4 जुलै रोजी तहसीलदार चिखली व गटविकास अधिकारी चिखली यांच्याकडे निवेदनाव्दारे घरकुलाच्या जागेची मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. सत्येंद्र भुसारी, पं.स सभापती दयानंद खरात, गटनेते लक्ष्मण अांभोरे, प्रा. आर. बी. वानखेडे सर, नंदु हाडे, सरपंच सौ. गिताताई आकाळ,सरपंच समाधान गिते, उपसरपंच गजानन आंभोरे, याच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या रमाई योजने अंतर्गत घरकुलासाठी मंजुरी झालेली आहेत पंरतू त्यांच्याकडे स्वत:ची जागा नसल्याने सरद घरकुलाला मान्यता मिळूूनही घरकुलाचा लाभ घेता येत नाही, रमाई योजने अंतर्गत मिळणा-या अनुदानात जागा घेवून घर बांधणे श्शक्य नसल्याने संसार उघडयावर जाण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने आम्हांला गावहददीत जागा उपलब्ध करून दिल्यास मिळालेले घरकुल पुर्णत्वास नेता येईल असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी समाधान आकाळ, सत्तारभाई, भारत गवई, सुभाष कांबळे, माधव कांबळे, मनोहर गवई, श्शेषराव गवई, सोनाजी कांबळे, केशव गवई, दिलीप गवई, मंगला गवई, फकीरा अंभोरे, सुमनबाई कांबळे, आबाई गवई, लक्ष्मी कांबळे,बेबी गवई, रमेशभुंजाळकर, यांच्यासह
भोरसा-भोरसी येथील अठरा लाभार्थी व एकलारा, नायगाव खुर्द, मंगरूळ नवघरे, सवणा येथील लाभार्थी उपस्थित होते.