सामाजिक आरोग्याबरोबर, पर्यावरणाचे आरोग्य सांभाळीत केले वृक्षारोपन
बुलडाणा, दि. 09 - सामाजिक आरोग्य सांशळण्याचे काम आरोग्य सेविकांना पार पाडावे लागते. सामाजिक आरोग्य जपतांना पर्यावरणाचा समतोल बिघडू नये, म्हणून केळवद ता.चिखली येथील आरोग्य सेविकांनी 1 जुलै रोजी वृक्षारोपण करुन वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. विशेष बाब म्हणजे या आरोग्य सेविकांनी शासनाच्या आदेशांपुर्वीच श्र उन्हाळयात स्वयंस्फुर्तीने वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगविले आहे. स्थानिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका सौ.सुलोचना प-हाड, सौ.मनिषा अहिर, आशासेविका रेखा हिवाळे, अंगणवाडी सेविका उषाबाई थोरात, नंदाबाई हिवाळे, सुनिता हिवाळे, राजमानेबाई यांनी परिसरात विविध वृक्षांचे रोपण केले. 1 जुलै रोजी शासनाच्या आदेशाप्रमाणे वृक्षारोपण सर्वत्र करण्यात आले. परंतु केळवद येथील आरोग्य उपकेंद्रात या आरोग्य सेविकांनी श्र उन्हाळयात विविध प्रकारचे 50 झाडे लावून ती जगविली आहे. नव्याने लागवड करण्यात आलेली झाडे जगविण्याचा निर्धार यावेळी आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांनी केला आहे.