Breaking News

न.पा.सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची तयारी ठेवाः आ.बोंद्रे

बुलडाणा, दि. 09 - चिखली शहराचा विकास गेल्या वर्षभरापासून मंदावलेला असून चिखली शहराचा विकास फक्त काँग्रेसच करू शकते. म्हणून शहराच्या  विकासासाठी अंत्यंत महात्वाच्या असलेल्या नगरपरिषदेत सत्ता मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागले पाहिजे असे असे प्रतिपादन प्रदेश  काँग्रेसचे सरचिटणीस शामभाउ उमाळकर यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे आयोजित चिखली शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.  कार्यक्रमाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे हे होते तर जिल्हा यु.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, तालुका अध्यक्ष  डॉ.सत्येंद्र भुसारी,  शहरअध्यक्ष प्रदिप पचेरवाल,  बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील,  यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पुढे बोलतांना शामभाउ उमाळकर म्हणाले की, चिखली नगरपरिषदेत अधिकतर काळ काँग्रेसचीच होती. परंतू गेल्या वर्षभरापासून भाजपच्या  ताब्यात सत्ता गेली. नगरपरिषदेत झालेले सत्तापालट हे मतदारांमुळे नाही तर कुरघोडीच्या व विश्‍वासघाताच्या राजकारणामुळे झाले असल्याचे त्यांनी लक्षात ठेवले  पाहिजेत. जनतेच्या सेवेसाठी सत्ता मिळवायची असेल तर परिश्रम घ्यावे लागतील, तसेच काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखलीचा काँग्रेस पॅटर्न  जिल्हाभर राबवून जिल्हा काँग्रेस बळकट करावी असे सांगितले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे म्हणाले की, मी जिल्हाध्यक्ष झालो हा सन्मान माइयासह संपूर्ण चिखलीकरांचा आहे. कितीही मोठा झालो  कोणत्याही पदावर गेलो तर चिखलीकरांचा सन्मान वाढेल असेच काम करणार तसेच मी कायम चिखलीकरांच्या ॠणांत राहील, कारण मी आज जो काही आहे तो  तुमच्यामुळेच. तसेच चिखलीमध्ये भाजपाच्या लोकांनी कुरघोडीचे राजकारण करून धनशक्तीच्या जोरावर नगरपरिषदेत सत्ता मिळविली. पण त्या पाठीत खंजीर  खुपसण्याच्या घटनेमुळे झालेली जखम मी अजुनही विसरलेलो नाही आणि त्या जखमेवर कुठलीही मलमपटटी ही केलेली नाही. पुन्हा नगरपालिका एकहाती  ताब्यात घेवूनच ती जखम बरी होणार आहे. आगामी काळात काँग्रेसचे उमेदवार स्वबळावर चिखलीकरांच्या मतदानरूपी आशिर्वादाने विजयी होतील. त्याच्यासाठी  कार्यकर्त्यांनी सुध्दा आत्तापासूनच कंबर कसून कामाला लागले पाहिजे.  चिखलीच्या व चिखलीकरांच्या सेवेसाठी आयुष्यभर परिश्रम घेण्याची तयारी असल्याचे  आ. राहुल बोंद्रे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
यावेळी जसवंतसेठ श्रीवास्तव, दिनदयाला वाधवाणी, हाजी दादुसेठ,सलिम मेमन, हानीफ बागवान,  डॉ. यादव साहेब, डॉ. सपकाळ, संजय पांढरे,  सचिन बोंद्रेे, कुणाल बोंद्रे, विजय गाडेकर, राणासुनिलकुमार सुरडकर, दयानंद खरात, दिपक लहाने,साहेबराव पाटील, विजय जागृत, गोकुळ शिंगणे, प्रशांत  देशमुख, सुनिल कासारे, राजु रज्जाक,  यांच्यासह मोठया संख्येन कार्यकर्त्याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरअध्यक्ष प्रदिप पचेरवाल यांनी तर  संचलन शाम वाकदकर यांनी केले.