प्रेमात फसवणूक, तरुणीची आत्महत्या, आरोपीची आईला धमकी
नांदेड, दि. 17 - तीन महिन्यांपूर्वी प्रेमप्रकरणात फसवणूक झाल्यानं नांदेडमधल्या 18 वर्षीय प्रियांका भुसेवारनं आत्महत्या केली होती. मात्र आता तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या आरोपीवरील गुन्हा मागे घ्यावा, यासाठी आरोपीच्या वडिलांनी प्रियंकाच्या आईला धमकावण्यास सुरुवात केली आहे.आमीर खान नावाच्या तरुणानं प्रेमात फसवल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आत्महत्येपूर्वी प्रियंकाने लिहिली होती. त्या सुसाईड नोटनुसार आणि प्रियांकाच्या आईच्या फिर्यादीनुसार आमीर खानविरोधात आत्महत्येस प्रवृत्त
केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.