Breaking News

पोलिसांच्या प्रलंबीत मागण्यांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून आढावा

जालना, दि. 17 - पोलीस प्रशासनाच्या शासनस्तरावर प्रलंबित प्रस्तावांचा आढावा व पोलीस लोकप्रतिनिधी समन्वय या हेतुने पोलीस अधीक्षक कार्यालयात  आयोजित बैठकीस पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीसांच्या विविध प्रश्‍नावर साधक बाधक चर्चा केली. ही बैठक दि.16 रोजी दुपारी 12-00 वा. पोलीस  अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार नारायण कुचे, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर या  बैठकीस
उपस्थित होते.