Breaking News

रिओत सानियाला पदकाची आशा

हैद्राबाद, दि. 23 - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला रिओत पदक जिंकण्याची आशा असून तशी तिने आपले मनोगत व्यक्त केले आहे. ब्राझीलमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पध्रेत खेळण्यासाठी उत्सुक असून इतर सहकार्‍यांसोबत स्पध्रेत चांगल्या कामगिरीची आशा भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यक्त केली.
“शनिवारी कॅनडाला रवाना होणार आहे आणि तेथून थेट रिओ ऑलि
म्पिक स्पध्रेत दाखल होईन. भारताचे सर्वात मोठे पथक यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. आम्ही सर्वच उस्तुक आहोत आणि आशा करतो की चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होऊ,’’ असे मत सानियाने व्यक्त केले.